लॅपटॉप स्लो होतोय? CPU आणि RAM 100% वापर थांबवण्याचे 5 स्मार्ट उपाय | Computer Speed Boost Tips.

संगणक आणि लॅपटॉप 10 पट वेगवान करण्याचे 5 जबरदस्त ट्रिक्स / Computer Speed Boost Tips.

Computer Speed Boost Tips in marathi

आजकाल अनेक युजर्सना असा अनुभव येतो की नवीन संगणक किंवा लॅपटॉप असूनही त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नाही. CPU चा वापर सतत 30–40% पेक्षा जास्त राहतो, अनेक वेळा तो थेट 100% पर्यंत जातो, तर RAM 80–90% पेक्षा जास्त वापरली जाते. यामुळे सिस्टम स्लो होते, हँग होते आणि साधी कामं करतानाही कॉम्प्युटर अडचणी देत राहतो किंवा हँग होतो.

जर तुमच्याकडे नवीन किंवा जुना लॅपटॉप/कॉम्प्युटर असून तो वारंवार स्लो चालत असेल, CPU आणि RAM पूर्णपणे वापरली जात असेल, तर ही समस्या दुर्लक्षित करून चालणार नाही. काही योग्य सेटिंग्स आणि काही सोप्या बदलांद्वारे तुम्ही तुमच्या संगणकाची कार्यक्षमता चांगलीच वाढवू शकता. या पोस्टमध्ये आपण CPU परफॉर्मन्स कसा सुधारायचा आणि RAM 100% वापराची समस्या कशी सोडवायची याबाबत सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत.

⚡ ट्रिक 1: Windows Visual Effects बंद करून CPU आणि RAM ची परफॉर्मन्स वाढवा.

जर तुमचा संगणक किंवा लॅपटॉप स्लो चालत असेल, CPU किंवा RAM जास्त वापरली जात असेल, तर ही पहिली ट्रिक खूप उपयोगी ठरते. Windows मध्ये अनेक animation, effects आणि transitions बॅकग्राऊंडला चालू असतात. ते दिसायला चांगले वाटतात, पण यामुळे सिस्टमची मेमरी आणि CPU जास्त वापरली जाते.

खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे अनावश्यक Visual Effects बंद करू शकता.

🪜 Step-by-Step प्रक्रिया:

Step 1 : कीबोर्डवर Windows + R बटण एकत्र दाबा.

Step 2 : उघडलेल्या Run बॉक्समध्ये sysdm.cpl टाइप करा आणि Enter दाबा.

Step 3: आता तुमच्यासमोर System Properties ही विंडो ओपन होईल.

Step 4: यामध्ये वर दिलेल्या पर्यायांमधून Advanced टॅबवर क्लिक करा.

Step 5: Advanced सेक्शनमध्ये तुम्हाला Performance नावाचा पर्याय दिसेल. त्याखालील Settings बटणावर क्लिक करा.

Step 6: आता Performance Options ही नवी विंडो उघडेल. यामधील पहिला टॅब Visual Effects दिसेल.

Step 7: इथे तुम्हाला अनेक animation आणि effects दिसतील, जसे की

  • Taskbar animations
  • Fade / Slide menus
  • Smooth edges
  • Window animations

हे सर्व effects RAM आणि CPU वापरतात.

Step 8: इथे दिलेल्या ऑप्शनमधून 👉 Adjust for best performance हा पर्याय सिलेक्ट करा.
यामुळे सर्व animation चे ticks आपोआप काढले जाणार आहे.

Step 9: आता Apply वर क्लिक करा आणि नंतर OK करा.

📌 याचा परिणाम काय होईल?

CPU आणि RAM चा वापर खूप कमी होईल.
सिस्टम अधिक स्मूथ आणि फास्ट चालू शकते.
थोडासा visual look कमी होईल (wallpaper, animation), पण परफॉर्मन्स खूप जास्त वाढणार आहे.

🚀 ट्रिक 2: Startup Apps बंद करून Windows Boot Speed आणि Performance वाढवा.

अनेक वेळा संगणक स्लो होण्याचं मोठं कारण म्हणजे Startup Apps हे असतं. जेव्हा तुम्ही PC किंवा Laptop ऑन करता, तेव्हा अनेक apps आपोआप बॅकग्राऊंडमध्ये सुरू होतात. तुम्हाला त्यांची गरज नसतानाही ते CPU आणि RAM वापरत राहतात, त्यामुळे सिस्टम स्लो होते.

खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही नको असलेले Startup Apps सहजपणे बंद करून टाकू शकता.

Step-by-Step प्रक्रिया:

Step 1: सर्वात आधी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये Search वर जा.

Step 2: Search बॉक्समध्ये 👉 Startup असं टाइप करा.

Step 3: आता Startup Apps असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

Step 4: आता तुमच्यासमोर अशा सर्व applications ची लिस्ट येईल, ज्या कंप्यूटर सुरू होताच आपोआप run होतात.
उदा. WhatsApp, Spotify, OneDrive, Microsoft Edge, Lenovo tools, Adobe Creative Cloud, Quick Share, PC Manager, Mobile Drives इ.

Step 5: ज्या apps ची गरज तुम्हाला PC सुरू होताच नाही, त्या apps समोरचा Toggle Off करा.

उदा.

  • WhatsApp
  • Spotify
  • Microsoft Edge
  • OneDrive
  • Adobe Creative Cloud /
  • CCXProcess
  • Quick Share
  • PC Manager
  • Mobile Drives.

Step 6: ज्या apps system साठी आवश्यक आहेत, त्या चालू ठेवू शकता.
उदा. Realtek HD Audio Driver आवश्यक CCTV software इत्यादी असेल तर चालू ठेवा. (जर वापरत असाल तर)

🧹 ट्रिक 3: Temp Files Delete करून Computer ची Speed वाढवा.

तुमचा संगणक किंवा लॅपटॉप स्लो चालत असेल, तर त्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे Temp (Temporary) Files हे असू शकत. जेव्हा तुम्ही कोणतंही application run करता, software install करता किंवा एखादा program वापरता, तेव्हा Windows आपोआप काही तात्पुरत्या फाइल्स तयार करते. या फाइल्सचा पुढे काहीही उपयोग नसतो, पण त्या Drive C मध्ये जागा व्यापून ठेवतात आणि कधी कधी बॅकग्राऊंडमध्ये रन होत राहतात.

या अनावश्यक temp files वेळोवेळी delete केल्यास तुमच्या सिस्टमची speed आणि performance दोन्ही सुधारते.

🪜 Step-by-Step प्रक्रिया:

Step 1: कीबोर्डवर Windows + R बटण एकत्र दाबा.

Step 2: Run बॉक्समध्ये 👉 temp असं टाइप करा आणि Enter दाबा.

Step 3: आता Temp Folder ओपन होईल. इथे तुम्हाला अनेक files आणि folders दिसतील.

Step 4: या सर्व files या temporary असतात. उदा.software run केल्यावर, install केल्यावर तयार झालेल्या फाइल्स असतात.

Step 5: कीबोर्डवर Ctrl + A दाबून त्या सर्व files select करा.

Step 6: आता Shift + Delete दाबा आणि Yes करा.
👉 यामुळे files permanently delete होतील.

Step 7: काही files delete होत नसतील, तर त्यांना skip करा.
त्या files सध्या एखाद्या software शी link असतील.

📌 हे का महत्त्वाचं आहे?

  • Drive C मधील अनावश्यक space मोकळी होते.
  • Background processes कमी होतात.
    System हलकी आणि fast होते.
  • Hanging आणि lagging ची समस्या कमी होते.

🔁 उपयोगी टीप:

वेळोवेळी (आठवड्यातून एकदा किंवा दोनदा) Temp Folder clean करत रहा, यामुळे तुमचा कंप्यूटर नेहमी smooth चालेल.

🔄 ट्रिक 4: Windows Update वेळेवर करा आणि System Drive Full होऊ देऊ नका.

अनेक वेळा संगणक स्लो किंवा हँग होण्यामागचं कारण Windows Update न केलेले असणे हेही असू शकते. Windows मध्ये येणाऱ्या अपडेट्समधून अनेक bugs fix होतात. जर हे अपडेट्स वेळेवर install केले नाहीत, तर ते बॅकग्राऊंडमध्ये RAM, CPU आणि disk वर ज्यादा लोड टाकतात, ज्यामुळे सिस्टमची परफॉर्मन्स कमी होऊ शकतो.

म्हणूनच Windows Update नेहमी up to date ठेवणं फार आवश्यक आहे.

🪜 Step-by-Step प्रक्रिया:

Step 1: सर्वात आधी कॉम्प्युटरवर Search वर जा.

Step 2: Search मध्ये 👉 Update Windows असं टाइप करा.

Step 3: आता Check for updates किंवा Update settings असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

Step 4: Windows Update पेज ओपन झाल्यावर 👉 Check for updates वर क्लिक करा.

Step 5: जर काही updates उपलब्ध असतील, तर त्यांना एकेक करून Install होऊ द्या.

Step 6: Update सुरू करण्यासाठी फक्त tick / install करायचं असतं आणि Windows आपोआप अपडेट install करतो.

Step 7: ज्या drive मध्ये तुमचं Operating System (बहुतेक वेळा C Drive) आहे,
ती drive Full (Red color) झाली आहे का, हे एकदा नक्की तपासा.

Step 8: जर C Drive full झाली असेल तर …

  • Apps run करताना CPU आणि RAM जास्त वापरली जाते.
  • System hang होण्याची शक्यता वाढते.
    Windows update नीट install होत नाही.
  • म्हणून C Drive मध्ये योग्य मोकळी जागा असणं खूप गरजेचं आहे.

📌 याचा फायदा काय होईल?

  • Windows मधील bugs fix होतील.
  • Background load कमी होईल.
  • RAM, CPU आणि Disk वरचा दबाव कमी होईल.
  • System अधिक stable आणि fast चालणार आहे.

🔋 ट्रिक 5: Power Options योग्य सेट करून Battery Life आणि Performance सुधारा.

काही वेळा संगणक किंवा लॅपटॉप स्लो वाटण्यामागचं कारण Power Settings चुकीच्या असणे हेही असू शकते. Windows मध्ये Power Options योग्य पद्धतीने सेट केल्यास, सिस्टम अनावश्यक resource वापरणं थांबवते आणि गरज नसताना स्वतःला sleep mode मध्ये घेऊन जाते. यामुळे CPU, RAM आणि battery वरचा ताण कमी होतो.

खास करून लॅपटॉप वापरणाऱ्यांसाठी ही सेटिंग खूप उपयोगी ठरते.

🪜 Step-by-Step प्रक्रिया:

Step 1: सर्वात आधी Start मेन्यूवर क्लिक करा.

Step 2: Search बॉक्समध्ये 👉 Power Options असं टाइप करा.

Step 3: आता Edit power plan किंवा Power & sleep settings असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

Step 4: इथे तुम्हाला On battery (लॅपटॉपसाठी)
Plugged in (चार्जरला जोडलेलं असताना) दोन मुख्य गोष्टी दिसतील.

Step 5: इथे ठरवा की Display किती वेळानंतर Turn off व्हावा.
Computer किती वेळानंतर Sleep mode मध्ये जावा
उदा.-
Display off: 5–10 मिनिटे
Sleep mode: 10–15 मिनिटे.

Step 6: तुमच्या वापरानुसार हे वेळापत्रक Edit करा.

📌 याचा फायदा काय होईल?

  • System गरज नसताना resources वापरणार नाही.
  • CPU आणि RAM ला आराम मिळेल.
  • Battery जास्त काळ टिकेल.
  • Laptop / PC गरम होणं कमी होईल.
  • Overall performance अधिक stable राहील.

🧽 ट्रिक 6: Disk Cleanup वापरून अनावश्यक Files व Folders काढून टाका.

कंप्यूटरमध्ये काळानुसार अनेक बेकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स जमा होत जातात. या फाइल्समुळे Drive मध्ये जागा अडते, सिस्टमवर अनावश्यक लोड येतो आणि परफॉर्मन्स स्लो होते. यासाठी Windows मध्येच दिलेला Disk Cleanup हा सोपा आणि सुरक्षित उपाय आहे.

Disk Cleanup वापरून तुम्ही कोणताही धोका न घेता अनावश्यक फाइल्स delete करू शकता.

🪜 Step-by-Step प्रक्रिया:

Step 1: सर्वात आधी Start बटणावर क्लिक करा.

Step 2: Search बॉक्समध्ये 👉 Disk Cleanup असं टाइप करा.

Step 3: Disk Cleanup हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

Step 4: आता तुमच्यासमोर एक विंडो येईल, जिथे विचारलं जाईल. 👉 कोणती Drive Clean करायची आहे?

Step 5: बहुतेक वेळा Operating System C Drive मध्ये असतो, म्हणून C Drive select करा आणि OK वर क्लिक करा.

Step 6: आता Windows त्या Drive मधील अनावश्यक फाइल्स Scan करायला सुरुवात करेल.

Step 7: Scan पूर्ण झाल्यावर, Temporary files, cache files, system logs अशा अनेक फाइल्सची यादी दिसेल.

Step 8: सर्व पर्यायांवर Tick करा. (या फाइल्स delete केल्याने सिस्टमवर काहीही वाईट परिणाम होत नाही.)

Step 9: आता OK वर क्लिक करा आणि नंतर Delete Files करा.

👉 यामुळे सर्व बेकारच्या फाइल्स permanently delete होतील.

📌 याचा काय फायदा होतो?

  • Drive मधील अनावश्यक space मोकळी होते.
  • System हलकी आणि fast होते.
  • CPU आणि RAM वरचा दबाव कमी होतो.
  • पुढच्या वेळेस Disk Cleanup चालवताना कमी junk files दिसतील.

🔁 महत्वाची सूचना:

जेव्हा-जेव्हा तुम्ही Internet वापरता, Software install करता, Apps run करता तेव्हा पुन्हा temporary files तयार होतात. म्हणून वेळोवेळी Disk Cleanup जरूर करा.

🛠️ ट्रिक 7: Microsoft PC Manager Tool वापरून एकाच क्लिकमध्ये Computer Fast करा. (100% Free)

आता शेवटची आणि खूपच उपयुक्त ट्रिक पाहूया. ही ट्रिक खास आहे कारण यामध्ये Windows कडूनच दिलेला पूर्णपणे Free Tool वापरला जातो. या एका टूलमधून तुम्ही RAM, CPU, Temporary Files, Startup Apps, Disk Cleanup, Windows Update आणि Protection सगळं एकाच ठिकाणी manage करू शकता.

या टूलचं नाव आहे Microsoft PC Manager. हे Windows 10 आणि Windows 11 दोन्हीसाठी Free उपलब्ध आहे.

🪜 Step-by-Step प्रक्रिया:

Step 1: कोणताही Browser ओपन करा आणि pcmanager.microsoft.com या वेबसाईटवर जा.

Step 2: इथून Microsoft PC Manager Free Download करा आणि Install करा.

Step 3: Install झाल्यानंतर हा Tool तुमच्या Computer मध्ये App म्हणून दिसू लागेल.

Step 4: PC Manager ओपन केल्यावर तुम्हाला Home Screen वरच RAM Usage,Temporary Files Size,PC Boost Option हे सगळं दिसेल.
उदा. RAM 84–85% वापरली जात असेल आणि Temporary Files 900MB पेक्षा जास्त ज्या असतील.

Step 5: आता फक्त PC Boost या बटणावर क्लिक करा.
👉 क्लिक करताच
Temporary files delete होतील,RAM usage हळूहळू कमी होऊ लागेल.
(हे तुम्ही Task Manager मध्येही live पाहू शकता.)

Step 6: Task Manager ओपन करा. (Ctrl + Shift + Esc)

Step 7: Processes टॅबमध्ये जा आणि ज्या apps जास्त RAM वापरत आहेत त्या ओळखा.

उदा.

  • Google Chrome (500MB+ RAM)
  • WhatsApp
  • Adobe Creative Cloud
  • Microsoft Edge (Background)
  • Photoshop (जर वापरत नसाल तर)

Step 8: गरज नसलेल्या apps वर End Task करा.
👉 यामुळे RAM वापर 60–70% वरून थेट 45% पर्यंत येऊ शकतो.

Microsoft PC Manager मधील Extra Features:

  • Home Section:
    Health Check
    PC Boost
    Disk Cleanup
  • Protection Section:
    Windows Update
    Virus & Threat Protection
  • Storage Section:
    Disk Cleanup
    Large Files Finder
    Duplicate Files Finder
  • Apps Section:
    Running Apps
    Startup Apps Management

👉 म्हणजेच, वेगवेगळ्या settings मध्ये जायची गरजच नाही.

📌 याचा मोठा फायदा काय?

  • एकाच tool मध्ये सगळं solution मिळेल.
  • RAM आणि CPU usage लगेच कमी होईल.
  • System fast आणि stable होईल.
  • Beginners साठीही खूप सोपं आहे.
  • पूर्णपणे Safe आणि Microsoft Official Tool आहे.

निष्कर्ष / Final Words

आशा आहे की या पोस्टमधून तुम्हाला नवीन किंवा जुना संगणक वेगवान कसा करायचा, CPU आणि RAM 100% वापराची समस्या कशी कमी करता येते, हे स्पष्टपणे समजलं असेल. योग्य settings, अनावश्यक apps बंद करणे, temporary files clean करणे आणि Microsoft च्या free tools चा वापर केल्यास कोणताही संगणक अधिक fast, smooth आणि stable चालू शकतो.

जर तुम्हाला अशाच प्रकारची उपयोगी टेक माहिती, Windows tips, computer speed वाढवण्याचे उपाय पुढेही वाचायला आवडतील, तर खाली comment करून नक्की कळवा. तुमच्या प्रश्नांवर आणि समस्यांवर आधारित पुढची पोस्ट घेऊन येईन. तोपर्यंत, जय महाराष्ट्र 🇮🇳

Leave a Comment