ऑनलाईन पॅन कार्ड कसे काढावे? / Pan Card Kase kadhave in marathi 2026.
भारतामध्ये आता पॅनकार्ड हे ओळखीचं सर्वात महत्त्वाचं document बनलं आहे. बँक खाते उघडणे, इनकम टॅक्स संबंधित कामे, सरकारी योजनांचा लाभ घेणे किंवा ऑनलाइन transactions या सर्वांसाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्हीही नवीन पॅनकार्ड बनवण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे.
या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घरबसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून स्वतःचे फोटो आणि सिग्नेचरसह पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. अगदी नवीन 2026 च्या पद्धतीनुसार Step-by-Step मार्गदर्शन देणार आहोत, जेणेकरून तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय तुमचा PAN Card सहज बनवू शकाल. म्हणून लेख शेवटपर्यंत नक्की वाचा!
घरबसल्या काढा ऑनलाईन पॅन कार्ड / How to apply for pan card online in marathi?
Step 1: PAN Card साठी अधिकृत वेबसाईटवर जा.

- सर्वात आधी तुम्हाला PAN Card Online Apply करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- https://onlineservices.proteantech.in/paam/endUserRegisterContact.html ही लिंक तुमच्या ब्राउजरमध्ये उघडा.
- येथे तुम्हाला PAN Card Application Form दिसेल.
Step 2: Application Type निवडा.

- पेज उघडल्यानंतर सर्वात वर Application Type एक पर्याय दिसेल, येथे तुम्ही खालील पर्याय निवडा.
- ➡ New PAN – Indian Citizen (Form 49A)
- हा पर्याय भारतीय नागरिकांसाठी नवीन PAN Card अर्ज करताना निवडायचा असतो.
Step 3: Applicant Category निवडा.

- Application Type निवडल्यानंतर पुढे तुम्हाला Applicant Category निवडायचा पर्याय दिसेल.
- जर तुम्ही स्वतःसाठी PAN Card बनवत असाल, तर तिथे
➡ Individual हा पर्याय निवडा. - यामुळे अर्ज तुमच्या वैयक्तिक PAN साठी असणार आहे.
Step 4: Applicant ची वैयक्तिक माहिती भरा.

थोडं खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला तुमची Personal Details भरायची असते. इथे तुम्हाला खालील माहिती भरावी लागेल.
- Title निवडा: Mr./Mrs./Ms.
➝ लक्षात ठेवा: Title हे PAN Card वर प्रिंट होत नाही. - Full Name
- Date of Birth
- Mobile Number
- Email ID
वरील सर्व माहिती आधार कार्डवर जशी आहे तशीच भरा, कारण PAN-Aadhaar linking अनिवार्य आहे.
Step 5: Complete Name Information भरा.
आता पुढे तुम्हाला तुमचं Complete Name (जसा आधार कार्डवर आहे तसाच) भरायचा आहे.
येथे खालील तीन बॉक्स दिसतील.
1️⃣ Last Name / Surname
2️⃣ First Name
3️⃣ Middle Name
माहिती भरताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:
- सर्व माहिती आधार कार्डवर जशी आहे तशीच भरा.
- स्पेलिंग अगदी बरोबर असणे आवश्यक आहे.
- चुकीची माहिती दिल्यास PAN तयार होण्यात त्रास होऊ शकतो.
- जर तुमच्याकडे Middle Name किंवा Surname नसल्यास➡ तुमचा First Name हा Surname (पहिला बॉक्स) मध्ये भरायचा➡ आणि First Name दुसऱ्या बॉक्समध्ये पुन्हा भरायचा. म्हणजे तुमचं नाव आधार कार्डशी match होईल.
Step 6: Date of Birth आणि Email ID भरा.
आता खालील दोन महत्त्वाच्या माहिती भरायच्या आहेत.
✔ Date of Birth (DD/MM/YYYY) ➡ तुमची जन्मतारीख आधार कार्डवर जशी आहे तशीच भरा.
✔ Email ID➡ ही Email ID अगदी बरोबर आणि तुम्ही वापरत असाल तीच लिहा, कारण तुमचा e-PAN Card ह्याच Email वर पाठवला जाणार आहे.
Step 7: मोबाईल नंबर भरा आणि फॉर्म सबमिट करा.
- सर्वात आधी इथे तुमचा मोबाईल नंबर भरा,त्यानंतर खाली स्क्रोल करून त्यांचा Disclaimer accept करा.
- त्यानंतर खाली दिलेला Verification Code टाका.
- I am not a robot समोरच्या check box वर क्लिक करा आणि शेवटी खालील Submit बटणावर क्लिक करा.
Step 8: Token Number मिळवा आणि पुढे जा.

- Submit करताच तुमच्या अर्जासाठी एक Token Number तयार होतो.
- हा Token Number म्हणजे तुमचा Login ID असतो.
- अर्जमधे सोडला तर या नंबरच्या मदतीने पुन्हा Login करून अर्ज तुम्ही पुढे पण भरू शकता.
- हा Token Number 30 दिवसांसाठी valid असतो, त्यानंतर खाली दिसणाऱ्या Continue बटणावर क्लिक करा.
Step 9: PAN Documents Submission Method निवडा.

पुढील पेजवर तुम्हाला Documents कसे सबमिट करणार हे निवडायचे असते. इथे तीन ऑप्शन्स दिसतील.
- जर तुम्ही पहिला पर्याय Aadhaar Based PAN Application निवडला, तर तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नाही.
- या पर्यायामध्ये PAN Card वर आधारवरील फोटोच प्रिंट होतो आणि Father Name आणि Signature प्रिंट होत नाही.
जर तुम्हाला PAN Card वर
➡ तुमचा स्वतःचा फोटो
➡ Father Name
➡ Signature प्रिंट करायचा असेल तर दुसरा पर्याय “PAN Application with Supporting Documents” पर्याय निवडा.
Step 10: PAN Card ची कॉपी कशी हवी ते निवडा.

खाली तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला PAN Card ची Physical कॉपी + Soft Copy दोन्ही हव्यात का, की फक्त Soft Copy (e-PAN) पुरेशी आहे.
- जर तुम्हाला➡ घरपोच Physical Card आणि Email वर e-PAN दोन्ही हवे असतीलतर पहिला पर्याय निवडा.
- यानंतर खाली Scroll करा.
Step 11: Aadhaar Details आणि Parents Details भरा.

- सर्वात आधी तुमच्या Aadhaar Card च्या शेवटच्या 4 digits भरा.
- यानंतर Name as per Aadhaar मध्ये आधारवर जसे स्पेलिंग आहे तसेच तुमचे नाव भरा.
- नंतर खाली Scroll करून Gender निवडा.
- यानंतर Parents Details भरणे आवश्यक आहे.
- Father चा Last Name / Surname
Father चा First Name
Father चा Middle Name - जर तुमच्या वडिलांच्या नावात Surname किंवा Middle Name नसेल, तर First Name हा पहिल्या बॉक्समध्ये (Surname मध्ये) भरायचा आहे.
- Mother’s Name हा पर्याय optional आहे → हवा असल्यास भरा, नसेल तर रिकामा ठेवा.
Step 12: PAN Card वर कोणाचे नाव प्रिंट करायचे ते निवडा.

- खाली तुम्हाला विचारले जाईल की PAN Card वर कोणाचे नाव प्रिंट करायचे वडिलांचे की आईचे?
- तुम्ही वडिलांच्या Details भरल्या असल्यास➡ Father’s Name हा पर्याय निवडा.
- नंतर खाली दिसणाऱ्या Next बटणावर क्लिक करा.
Step 13: Income Source निवडा.

- या पेजवर तुम्हाला तुमची उत्पन्नाची सोर्स कोणती आहे हे निवडायचं आहे.
- तुम्ही Salary, Business, Rental किंवा Other Income मधून जे लागू असेल ते निवडा.
- जर कोणतेही उत्पन्न नसेल तरतर खाली दिलेला No Income पर्याय निवडू शकता.
माझ्या Case मध्ये येथे Salary Income निवडले आहे.
Step 14: Communication Address निवडा.

इथे तुम्हाला PAN Card कोणत्या पत्त्यावर मिळवायचा आहे हे निवडायचे आहे. तुमच्याकडे दोन पर्याय असतात:
- Residence Address (घराचा पत्ता)
- Office Address (कार्यालयाचा पत्ता)
तुम्ही ज्या पत्त्यावर PAN Cardची Physical कॉपी मिळवू इच्छिता,तो पर्याय निवडा.
Step 15: Residence व Office Address भरा.
- खाली तुम्हाला तुमचा Complete Residence
Address (घराचा संपूर्ण पत्ता) भरायचा आहे. - यानंतर पुढे दिसणाऱ्या सेक्शनमध्ये Office Address भरायचा पर्याय दिसेल.
- जर तुम्ही संपर्क पत्ता म्हणून Residence निवडलं असेल तर Residence Address अचूक भरा आणि Office Address रिकामं ठेवू शकता.
Step 16: Country Code निवडा आणि पुढे जा.

- थोडं खाली स्क्रॉल करून Telephone Number & Email ID Details पर्यायावर जा.
- इथे तुम्ही Country Code निवडा ➡ भारतासाठी +91 निवडा.
- यानंतर खाली Next बटणावर क्लिक करा.
Step 17: AO Code (Assessing Officer Code) निवडा.

- नेक्स्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला AO Code (Assessing Officer Code) निवडायचा असतो.
- हा कोड म्हणजे तुमच्या पत्त्यानुसार PAN Office Code आहे.
AO Code शोधण्यासाठी खालील पर्याय निवडा.
- Indian Citizen हा पर्याय निवडा.
- तुमचा State निवडा.
- तुमचे City / Area निवडा व नंतर Fetch वर क्लिक करा.
तुमच्या पत्त्याशी जुळणारे AO Codes ची लिस्ट दिसेल. त्या लिस्टमधून बरोबर AO Code निवडा. नंतर खालील Next बटणावर क्लिक करा.
Step 18: Identity, Address आणि DOB Proof निवडा.

या पेजवर तुम्हाला खालील Document Proof निवडावे लागतात:
- Proof of Identity
- Proof of Address
- Proof of Date of Birth
- जसेच तुम्ही पर्यायावर क्लिक करता ➡ Supporting Documents ची एक लिस्ट दिसेल.
- या लिस्टमधून तुमच्याकडे उपलब्ध असलेले डॉक्युमेंट निवडा. (उदा. Aadhaar Card, Passport, Driving License इ.)
- जर तुमच्याकडे Aadhaar असेल तर तीनही ठिकाणी Aadhaar Document म्हणून निवडू शकता. ही सर्वांत सोपं आणि Fast Process आहे.
Step 19: Declaration भरा आणि Photo व Signature Upload करा.

- खालील Declaration सेक्शनमध्ये Himself / Herself हा पर्याय निवडा. (तुम्ही स्वतः अर्ज करत आहात हे दर्शवते)
- यानंतर Place (शहराचे नाव) भरा आणि खाली Scroll करा. येथे तुम्हाला Photo आणि Signature Upload करण्याचा पर्याय दिसेल.
- PAN Card वर हवी असलेली पासपोर्ट साइज फोटो अपलोड करा.
- तिथे दिलेल्या size आणि dimensions प्रमाणेच फोटो असावा.
- त्यानंतर तुमचा Signature upload करा.
- Photo व Signature दोन्ही clear आणि नियमांप्रमाणे असणे आवश्यक आहे.
Step 20: Supporting Documents Upload करा.

- खाली Upload Supporting Documents सेक्शन दिसेल.
- इथे तुम्ही Proof म्हणून जे Documents निवडले आहेत.
(Proof of Identity / Address / Date of Birth) - तेच Documents इथे Upload करायचे आहेत.
Document Upload करण्यासाठी खालील स्टेप्स
- Plus ( + ) चिन्हावर क्लिक करा.
- Upload पर्याय निवडा.
आणि सर्व Documents Upload झाल्यावर खालील Submit बटणावर क्लिक करा.
Step 21: Aadhaar Details Verify करा आणि Payment ला पुढे जा.
- या पेजवर सर्वात आधी तुमच्या Aadhaar Card चे पहिले 8 digits भरा.
- नंतर खाली Scroll करा आणि तुमच्या Application Form मधील सर्व Details पुन्हा एकदा तपासा.
- जर कुठे बदल करायचा असेल तरEdit पर्याय दिलेला आहे तेथे बदल करू शकता.
- सर्व माहिती बरोबर असल्यास Proceed बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला PAN Card Fees Payment करायचा पर्याय दिसेल.येथे Payment Mode निवडा.
Step 22: PAN Card Fees भरा आणि पेमेंट करा.

खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला PAN Card Application Fees ची डिटेल दिसेल साधारणपणे ₹106.90 आहे.
पेमेंट करण्यासाठी:
- सर्व माहिती तपासा.
- खाली दिलेले Terms & Conditions accept करा.
- नंतर Proceed to Payment किंवा समकक्ष बटणावर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट पद्धत निवडण्याचा पर्याय येईल आणि त्यानंतर तुमचा PAN Card अर्ज पूर्ण होईल.
Step 23: Payment Confirm करा आणि पेमेंट पूर्ण करा.

या पेजवर तुम्हाला पुन्हा एकदा Pay Confirm वर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्ही Payment Portal वर Redirect व्हाल.
पेमेंटसाठी खालील पर्याय मिळतात.
- Credit Card
- Debit Card
- UPI
- Net Banking
यापैकी कोणताही पर्याय वापरून पेमेंट पूर्ण करा.
पेमेंट Successful झाल्यावर पुढील पेज दिसेल आणि तुम्ही Continue बटणावर क्लिक करा.
Step 24: Aadhaar Authentication करा.

- या पेजवर तुम्हाला तुमचा Aadhaar Authenticate करायचा आहे.
- तिथे दिलेले Terms & Conditions accept करा
आणि Authenticate बटणावर क्लिक करा. - यानंतर तुमच्या Aadhaar-registered Mobile Number वर एक OTP येईल.
तो OTP खाली योग्य जागी भरा आणि Submit वर क्लिक करा.
Step 25: e-Sign करून अर्ज पूर्ण करा.

- या पेजवर Continue with e-Sign बटणावर क्लिक करा.
- यानंतर पुढील पेजवर Terms & Conditions पुन्हा Accept करा.
खाली तुमची VID किंवा Aadhaar Number भरा - Send OTP वर क्लिक करा.
- तुमच्या Aadhaar-registered Mobile Number वरएक नवीन OTP येईल.
- तो OTP Enter OTP मध्ये भरा आणि खालील Verify OTP वर क्लिक करा.
Step 26: अर्ज सबमिट करा आणि Acknowledgement डाउनलोड करा.

- Verify OTP क्लिक करताच तुमचा New PAN Application Submit होईल.
- यानंतर PAN Card ची PDF File (Acknowledgement) डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला Password टाकावा लागेल.
- ➡ Password = तुमची जन्मतारीख (DD/MM/YYYY) उदा. 05/08/1993 अश्या फॉरमॅट मध्ये टाकावे लागेल.
- Password टाकताच तुमची PAN Acknowledgement PDF उघडेल.
Step 27: PAN Number व e-PAN मिळवा.
- Online Application सबमिट केल्यानंतर 24 तासांच्या आत तुमचा PAN Number Generate केला जातो.
- 👉 e-PAN Card ची Soft Copy तुमच्या Registered Mobile Number / Email वर पाठवली जाते.
- आणि काही दिवसांतPhysical PAN Card तुमच्या दिलेल्या पत्त्यावर पाठवला जातो.
Final Words :-
दोस्तांनो, आता पॅन कार्ड बनवणे खूपच सोपं झालं आहे. फक्त काही स्टेप्स फॉलो केल्या आणि तुम्ही घरबसल्या Online आपल्या आवडीचा Photo व Signature लावून नवीन PAN Card साठी अर्ज करू शकता. अर्ज सबमिट केल्यानंतर कमी कालावधीत PAN Number Generate होतो आणि e-PAN तुमच्या ईमेलवर मिळतो. काहीच दिवसांत Physical PAN Card देखील तुमच्या पत्त्यावर पोहोचतो.
जर अजूनही तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल किंवा नवीन अपडेटेड पॅन कार्ड हवं असेल, तर आजच Online Apply करा आणि तुमचं PAN Card सहज घरपोच मिळवा!