ऑनलाईन नवीन मतदान कार्ड कसे बनवायचे? | How to apply Voter ID Card Online 2026?.

नवीन वोटर कार्ड ऑनलाइन कसे काढावे मराठी / Voter Card Kase Kadhave In Marathi 2026.

भारतामध्ये मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि यासाठी Voter ID Card असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचे वय आता 18 वर्षांपेक्षा जास्त झाले असेल आणि अजूनही तुम्ही मतदार ओळखपत्र बनवले नसेल, तर काळजी करू नका. 2026 मध्ये सुरू झालेल्या नवीन ऑनलाइन प्रक्रियेच्या मदतीने तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत तुमच्या नावाने नवीन Voter ID Card साठी अर्ज करू शकता आणि तुमचे PVC Voter Card सहज तयार करून घेऊ शकता.

या पोस्टमध्ये आपण 2026 च्या नवीन प्रक्रियेप्रमाणे Voter ID Apply Online करण्याची संपूर्ण Step-by-Step माहिती पाहणार आहोत. या पोस्टमधे आपण पाहणार आहोत कोणते डॉक्युमेंट लागतात?, ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा?, e-Sign कसा करायचा आणि अर्ज केल्यानंतर कार्ड कसे मिळते?, ही सर्व माहिती आम्ही सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. नवीन मतदार कार्ड काढायचे असेल तर हा प्रोसेस Follow करून तुम्ही तुमचे Voter ID सहज मिळवू शकता.

नवीन वोटर कार्ड कसे बनवायचे? / How to apply Voter ID Card Online 2026?

Step 1: अधिकृत Voter ID पोर्टलवर जा आणि Sign Up करा.

Voter card apply process 1

  • सर्वात आधी तुम्हाला https://voters.eci.gov.in/signup या अधिकृत पोर्टलवर जायचे आहे. ही लिंक उघडताच तुम्हाला Voter Services चा मुख्य पेज दिसेल.
  • येथे नवीन Voter ID साठी अर्ज करण्यापूर्वी ➡ Sign Up करणे आवश्यक आहे.
  • म्हणून पेजवर दिसणाऱ्या Sign Up बटणावर क्लिक करा आणि पुढील प्रक्रिया सुरू करा.

Step 2: Mobile Number / Email टाका आणि OTP द्वारे Registration पूर्ण करा.

Voter card apply process 2

  • Sign Up पेजवर सर्वात आधी तुमचा Mobile Number टाका. तुमच्याकडे Email ID असल्यास तीही भरू शकता. यानंतर Continue वर क्लिक करा.
  • पुढच्या पेजवर तुम्हाला तुमचे नाव, एक Password हे सेट करावे लागेल.
  • तुम्ही दिलेल्या Mobile Number आणि Email वर OTP पाठवला जाईल.
    तो OTP टाकून तुमचे Registration Complete करा.

Step 3: OTP टाकून पोर्टलमध्ये Login करा.

Voter card process 3

Registration पूर्ण झाल्यानंतर आता तुम्हाला Login करायचे आहे. त्यासाठी खालील स्टेप्स कराव्या लागतील.

  • सर्वात आधी तुम्ही Registration मध्ये दिलेला Mobile Number येथे भरा.
  • नंतर Request OTP बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या नंबरवर आलेला OTP योग्य जागी भरा आणि Verify & Login वर क्लिक करा.
  • OTP Verify होताच तुम्ही पोर्टलमध्ये सफलतापूर्वक Login व्हाल.

Step 4: Login नंतर Form-6 ओपन करा आणि पहिली माहिती भरा.

Voter card apply step 4

Login केल्यावर तुमच्या समोर Voter Portal चं Dashboard येईल. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी Form-6 भरायचा असतो.

  • सर्वात पहिले तुम्ही Form-6 बटणावर क्लिक करा.
  • आता जो फॉर्म उघडेल त्यात जो-जो प्रश्न विचारले जातील ते स्टेप-बाय-स्टेप भरत जा.
  • सुरुवातीला State निवडा म्हणजे तुम्ही कोणत्या राज्यात आहात ते टाका.
    त्यानंतर District निवडा, तुमचा जिल्हा निवडा.
  • पुढे Assembly Constituency (विधानसभा) नीट तपासून निवडा. हे खूप महत्त्वाचं आहे, चुकीची विधानसभा निवडू नका.
  • सर्व योग्य असेल तर Next बटणावर क्लिक करा आणि पुढील स्टेप्स भरायला पुढे जा.

Step 5: Personal Details भरा आणि फोटो Upload करा.

Voter card details step 5

या स्टेपमध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती (Personal Details) भरायची आहे.

  • सर्वात आधी तुमचे First Name टाका. नाव लिहिल्यावर ते आपोआप हिंदीमध्ये रूपांतरित होईल.
  • जर रूपांतरात चूक असेल, तर Keyboard आयकॉन वर क्लिक करून तुम्ही ते योग्य हिंदी नाव manually टाइप करू शकता.
  • त्यानंतर तुमचा Surname असल्यास तो भरा. Surname टाकल्यानंतर तेही खाली हिंदीमध्ये दिसेल. त्यात चूक असल्यास ते सुधारू शकता.

Step 6: Relative (Father/Mother/Spouse/Guardian) चे नाव भरा.

Voter card details step 6

नेक्स्ट क्लिक केल्यानंतर या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या Relative चे नाव भरावे लागेल. इथे तुम्ही खालीलपैकी कोणाचं नाव देऊ शकता.

  • Father
  • Mother
  • Husband
  • Wife
  • Legal Guardian
  • तुम्हाला ज्या नात्याचा पर्याय लागू आहे तो Select करा.
  • उदा. जर तुम्हाला Father चे नाव द्यायचे असेल तर Father निवडा.

नंतर:

  • Relative चं First Name टाईप करा ते आपोआप हिंदीमध्ये दिसेल, Surname तेही भरा.
  • सर्व माहिती नीट भरल्यानंतर Next बटणावर क्लिक करा.

Step 7: Contact Details व Aadhaar माहिती भरा.

Voter card step 7

या स्टेपमध्ये तुमची Contact Details भरायची आहे.

  • मोबाइल नंबर जर तुमचाच असेल तर Self निवडा आणि तुमचा नंबर भरा.
  • जर तुमचे आई-वडील किंवा घरातील इतर कोणाचा नंबर वापरणार असाल तर त्यांचा पर्याय निवडा आणि नंबर भरा.

त्यानंतर:

  • Email ID तुमची स्वतःची असेल तर Self निवडा आणि Email भरा.
    किंवा घरातील इतर कोणाची असेल तर संबंधित पर्याय निवडा.
  • Contact Details देणे आवश्यक आहे, कारण पुढील संपर्क या नंबर आणि Email द्वारेच होईल.

यानंतर Next वर क्लिक करा.

  • तुमच्याकडे आधारकार्ड नंबर असल्यास तो येथे भरा.
  • नसल्यास “No” निवडू शकता, पण Aadhaar असल्यास देणे फायदेशीर आहे.
  • आता Next बटणावर क्लिक करा.

Step 8: Gender, Date of Birth व DOB Proof अपलोड करा.

Voter card step 8

  • या स्टेपमध्ये सर्वात आधी तुमचा Gender निवडा. Male / Female / Third Gender कोणताही लागू असल्यास निवडा. नंतर Next वर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला तुमचे Date of Birth Proof निवडायचे आहे.
  • इथे उपलब्ध असलेल्या प्रूफमध्ये तुम्ही खालीलपैकी कोणताही वापरू शकता:
  1. Birth Certificate
  2. Aadhaar Card
  3. PAN Card
  4. Driving License
  5. 10th / 12th Certificate
  6. Indian Passport

तुमच्याकडे आधार असल्यास

➡ Aadhaar Card निवडा.
➡ आधार कार्डची self-attested front व back scan copy तयार करा.
➡ File Format: JPG, JPEG, PNG किंवा PDF
➡ Size: 2MB पेक्षा कमी पाहिजे आणि Choose File वर क्लिक करून Upload करा.

यानंतर तुमचे Date of Birth निवडा:

  • Calendar मधून सर्वात आधी Year निवडा, त्यानंतर Month आणि शेवटी Date टाका.
  • ही DOB माहिती तुमच्या प्रूफशी अगदी आहे तशी जुळली पाहिजे.
  • सगळं भरल्यावर Next बटणावर क्लिक करा.

Step 9: Present Address भरा आणि Address Proof अपलोड करा.

Voter card apply step 9

या स्टेपमध्ये तुमचा सध्याचा पत्ता (Present Address) भरावा लागेल.
इथे तुम्हाला खालील माहिती भरायची आहे.

  1. Apartment / House / Building Number
  2. Mohalla / Road / Area
  3. Village / Town
  4. Post Office
  5. Pin Code
  6. Tehsil
  7. District (इथे District पुन्हा निवडायचा आहे)
  8. State आधीच निवडलेला असेल.

तुम्ही टाईप केलेली माहिती आपोआप हिंदीमध्ये रूपांतरित होते. जर नावात चूक दिसली तर edit करून दुरुस्त करू शकता.

यानंतर Address Proof द्यावा लागतो, त्यासाठी उपलब्ध पर्याय खालील प्रमाणे.

  1. Gas Bill
  2. Electricity Bill
  3. Water Bill
  4. Aadhaar Card
  5. Bank Passbook
  6. Indian Passport
  7. Land Documents / Registry Deed

तुझ्याकडे आधार असल्याने:

➡ Aadhaar Card हा पर्याय निवडा
➡ आधारची self-attested front व back scan copy तयार करा.
➡ Format: JPG / JPEG / PNG / PDF
➡ File size: 2MB पेक्षा कमी पाहिजे आणि Choose File वर क्लिक करून upload करा.

सर्व माहिती व documents अपलोड झाल्यावर Next वर क्लिक करा.

Step 10: Disability संबंधित माहिती (लागू असल्यास) भरा.

Voter card apply step 10

या स्टेपमध्ये, ज्यांचा फॉर्म भरला जात आहे ते Divyang / विकलांग असल्यास, त्यांची माहिती येथे देऊ शकता.

उपलब्ध पर्याय:

  • Locomotive Disability
  • Visual Disability
  • Deaf & Dumb
  • Other Disability

लागू असल्यास:

  • संबंधित Percentage (%) भरा.
  • Disability Certificate असेल तर Yes निवडून ते Upload करा.
  • जर व्यक्ती विकलांग नसल्यास किंवा प्रमाणपत्र नसेल, हा विभाग रिकामा ठेवून थेट Next वर क्लिक करू शकता.

Step 11: Family Member चा Voter ID तपशील भरा. (शिफारसीय)

Voter card apply step 11

या स्टेपमध्ये तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा,
ज्यांचे नाव आधीच Voter List मध्ये आहे, त्यांची माहिती देणे आवश्यक (किंवा अत्यंत उपयुक्त) आहे.

खालील कुटुंबातील व्यक्तीची माहिती देऊ शकता. यामुळे तुमचा Voter ID अर्ज लवकर मंजूर होतो.

  1. आई
  2. वडील
  3. Husband / Wife
  4. Legal Guardian.

येथे तुम्हाला खालील माहिती भरायची आहे.

  • त्या व्यक्तीचे Full Name
  • तुमचा त्यांच्याशी Relationship
  • त्यांचा Voter ID Number (EPIC Number)
  • सर्व तपशील नीट भरल्यानंतर Next वर क्लिक करा.

Step 12: Annexure-D प्रमाणे Birth Proof अपलोड करा.

या स्टेपमध्ये Annexure-D नुसार तुमचे जन्मस्थान आणि जन्मवर्ष पाहून कोणते डॉक्यूमेंट द्यायचे आहेत ते ठरते.

नियम (नवीन 2026 अनुसार):

1) जर तुमचा जन्म 1987 ते 2004 दरम्यान झाला असेल तर तुमचे स्वतःचे एक Birth Proof द्यावे लागेल आणि आई/वडिलांपैकी कोणाचेही एक डॉक्यूमेंट द्यावे लागेल.
2) जर तुमचा जन्म 1987 पूर्वी झाला असेल: फक्त तुमचे स्वतःचे डॉक्यूमेंट पुरेसे आहे, माता-पित्यांचे डॉक्यूमेंट द्यायची गरज नाही.
3) जर तुमचा जन्म 2004 नंतर झाला असेल: तुमचे स्वतःचे Birth Proof आणि आई-वडिल दोघांपैकी एकाचे डॉक्यूमेंट द्यावे लागते.
4) जर तुमचा जन्म भारताच्या बाहेर झाला असेल:
“Outside India” निवडा आणि त्या देशाचा Birth Proof अपलोड करा.

कोणते डॉक्यूमेंट चालतात?
लिस्टमधून उपलब्ध पर्यायांपैकी तुम्ही वापरू शकता:

  • Aadhaar Card
  • Birth Certificate
  • Passport
  • School Certificate (10th/12th)इत्यादी

तुमच्याकडे आधार असल्यास खालील पध्दतीने कागदपत्रे अपलोड करा.

  1. Aadhaar निवडा.
  2. आधारची front आणि back self-
  3. Attested scan copy Upload करा.
  4. JPG/JPEG/PNG: 2MB पर्यंत
    PDF: 3MB पर्यंत.
  5. सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर पुढे जा.

Step 13: Mother/Father चा Document Upload करा आणि Signature द्या.

या स्टेपमध्ये तुमच्या आई किंवा वडिलांपैकी कोणाचंही एक डॉक्यूमेंट अपलोड करणे आवश्यक आहे.

Document निवडण्यासाठी उपलब्ध पर्याय:

  • तुमचा Voter ID (EPIC)
  • Aadhaar Card (हा सर्वात सोपा पर्याय)
  • ➡ माता–पित्यांपैकी कोणाचेही एक डॉक्यूमेंट देणे अनिवार्य आहे.
  • ➡ Upload करताना फाइलचा साइज खालीलप्रमाणेच:
    JPG/JPEG/PNG → 2MB
    PDF → 3MB
  • यानंतर इथे Citizenship Type विचारलेली असेल.
  • ➡ भारताचे नागरिक असल्यास काही बदल न करता हा भाग तसाच सोडू शकता.

Signature / Thumb Impression Upload करा.

  • खाली तुम्हाला Signature किंवा Thumb Impression अपलोड करण्याचा पर्याय दिसेल.
  • पांढऱ्या कागदावर तुमचा Signature करून त्याचा स्पष्ट फोटो घ्या किंवा
    Signature नसेल तर Thumb Impression चा फोटो अपलोड करू शकता.
  • Choose File वर क्लिक करून Signature/Thumb ची Image Upload करा.

सर्व माहिती व दस्तऐवज योग्यरीत्या भरल्यानंतर ➡ Next बटणावर क्लिक करा.

Step 14: Declaration भरा आणि Residence Details द्या.

Next क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर Declaration फॉर्म दिसेल.
इथे तुम्हाला पुढील माहिती भरावी लागेल:

  • तुम्ही ज्या Village/Town मधून फॉर्म भरत आहात त्याचे नाव टाकायचे आहे.
  • तुमचे State (उदा. Maharashtra )
    तुमचा District

यानंतर Section 8(ए) अंतर्गत तुम्हाला तुमचा सध्याचा रहिवास (Ordinary Residence) किती काळाचा आहे, हे सांगावे लागेल.

दोन परिस्थिती असतात:

✔️ 1) जर तुमचा जन्म ज्या ठिकाणी झाला, तेथेच तुम्ही अजूनही राहत असाल तर तुमच्या Date of Birth चा Month व Year येथे लिहा. (याचा अर्थ तुम्ही जन्मापासूनच तिथे राहत आहात.)
✔️ 2) जर तुमचा जन्म दुसरीकडे झाला असेल आणि आता तुम्ही वेगळ्या ठिकाणी राहत असाल तर सध्याच्या ठिकाणी किती Months / Years पासून राहत आहात ते लिहा.

ही माहिती योग्य देणे आवश्यक आहे, कारण त्यावरच तुमचा Ordinary Residence Verification ठरतो.

Step 15: Preview पाहा आणि e-Sign करून फॉर्म सबमिट करा.

Voter card step 15

शेवटच्या स्टेपमध्ये, ज्या ठिकाणाहून तुम्ही फॉर्म भरत आहात त्या जागेचे नाव वर दिसेल आणि Date आपोआप भरलेली असेल.
यानंतर खाली दिलेला Captcha भरा आणि Preview & Submit वर क्लिक करा.
आता तुमच्या समोर Preview Section उघडेल,
जिथे तुम्ही भरलेली सर्व माहिती नीट तपासून पाहावी.
➡ जर सर्व माहिती योग्य वाटत असेल तर e-Sign & Submit वर क्लिक करा.
➡ काही माहिती चुकीची वाटल्यास Edit करून बदल करू शकता.
➡ तसेच हवे असल्यास Download करून प्रीव्ह्यूची PDF सेव्हही करू शकता.

Step 16: Aadhaar द्वारे e-Sign करा आणि Reference Number मिळवा.

e-Sign & Submit वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर Aadhaar e-Sign प्रक्रिया उघडते. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास अर्ज पूर्ण मानला जात नाही.

इथे तुम्हाला:

  1. तुमचा Aadhaar Number टाकायचा आहे.
    Get OTP वर क्लिक करायचे आहे.
  2. Aadhaar-linked mobile वर आलेला OTP टाकायचा आहे.
  3. Submit बटणावर क्लिक करायचे आहे.
    OTP Verify झाल्यावर तुमचा e-Sign process पूर्ण होतो.
  4. यानंतर स्क्रीनवर तुम्हाला एक Reference Number मिळतो.
  5. हा नंबर तुमच्या अर्जाच्या Status साठी महत्त्वाचा आहे.
  6. त्यामुळे तो नोट करून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.

Step 17: Application Status कसा तपासायचा.

कधीही तुम्हाला तुमच्या Voter ID Application चा Status पाहायचा असेल तर खालील पध्दतीने पाहू शकता.

  • सर्वात आधी Voter Portal च्या Homepage वर या.
  • इथे तुम्हाला Track Application Status असा पर्याय दिसेल.
  • त्यावर क्लिक करा.
    तुमचा मिळालेला Reference Number टाका.
  • Submit बटणावर क्लिक करा.
    यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या अर्जाचा सध्याचा Status दिसेल.
  • सर्व माहिती योग्य दिली असेल तर तुमचा Voter ID Card लवकरच तयार होईल.

Final Words

दोस्तांनो, आजच्या पोस्टमधे दिलेल्या संपूर्ण प्रक्रियेच्या मदतीने तुम्ही घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने Online Voter ID Card साठी Apply करू शकता. फक्त काही स्टेप्समध्ये Form-6 भरून, आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करून आणि Aadhaar e-Sign पूर्ण केल्यावर तुमचा अर्ज सबमिट होतो. त्यानंतर Reference Number च्या मदतीने तुम्ही कधीही Application Status Track करू शकता.

जर सर्व माहिती बरोबर भरलेली असेल, तर काही दिवसांत तुमचे नाव मतदार यादीमध्ये जोडले जाते आणि तुमचा नवा Voter ID Card तुम्हाला घरपोच मिळतो. त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत तुमचे मतदार ओळखपत्र बनवले नसेल, तर विलंब न करता 2026 च्या या नवीन Online Voter ID Apply Process चा वापर करून सहजपणे तुमचे कार्ड मिळवा. मतदान हा तुमचा हक्क आहे, तो नक्की जपा!

Leave a Comment