AI Creator बना! घरबसल्या YouTube Shorts वरून करा लाखोंची कमाई

आजच्या डिजिटल युगात youtube shorts म्हणजे शिक्षण मनोरंजन आणि कमाई चे खूप चांगले साधन झाले आहे. युट्युब शॉट च्या मदतीने तुम्ही एक चांगले इन्कम कमवू शकता, तेही घरबसल्या तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडत नाही फक्त तुम्हाला एक स्मार्टफोन पाहिजे असतो. युट्युब शॉर्ट या 15 ते 7 सेकंदाच्या छोट्या व्हिडिओ ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, आजकाल सर्वांना हा प्रश्न पडला आहे की मी youtube shorts च्या माध्यमातून पैसे कसे कमवू शकतो आणि youtube shorts च्या माध्यमांनी पैसे कमावण्याचे कोणकोणते माध्यम आहेत.

आधी YouTube साठी खूप महागडे कॅमेरे, एडिटिंग सॉफ्टवेअर आणि अनुभवाची आवश्यकता असायची. पण आज AI Tools मुळे ही सर्व प्रोसेस खूप सोपी झाली आहे. ChatGPT, CapCut AI, ElevenLabs किंवा Pictory सारखी टूल्स वापरून तुम्ही काही मिनिटांत स्क्रिप्ट लिहू शकता, व्हॉइसओव्हर तयार करून आकर्षक Shorts बनवू शकतोस. तेही काही मिनिटांमध्ये.

🎬 YouTube Shorts म्हणजे काय?

आज काल शॉर्ट्स कन्टेन्ट ची खूप मागणी आहे, इंस्टाग्राम सारखे अँप्स वर लाखो लोक रिल्स बनवून टाकत असतात, तर आजकाल लोकांकडे वेळेचा अभाव असल्यामुळे लोक लाँग व्हिडिओ बघत नाहीत, त्यामुळं शॉर्ट्स कन्टेन्ट ला खूप डिमांड आली आहे, त्यामुळे यूट्यूब ला मार्केट मध्ये टिकून राहण्यासाठी YouTube Shorts नावाचे प्लॅटफॉर्म तयार करावे लागले, यूट्यूब शॉर्ट्स हे 15 ते 60 सेकंदांचे उभे (vertical) व्हिडिओ असतात, जे मोबाइलवर पटकन पाहता येतात. हे म्हणजे YouTube ची “short-form content” स्वतःचे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही कन्टेन्ट अपलोड करून जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमवू शकतात. इथे कंटेंट जलद, आकर्षक आणि सोप्या पद्धतीने दाखवला जातो.

Shorts ची खासियत म्हणजे, व्हिडिओ लहान असतात पण इम्पॅक्ट मोठा असतो. व्ह्यूज पटकन वाढतात आणि सर्वात मोठं म्हणजे, आता Shorts वरून कमाई (Monetization) करणं सुद्धा शक्य आहे!

📱 Reels, TikTok आणि Shorts यांच्यात काय फरक आहे?

बर्‍याच जणांना वाटतं की YouTube Shorts म्हणजे फक्त Reels किंवा TikTok ची कॉपी. पण प्रत्यक्षात काही मोठे फरक आहेत: म्हणजेच, Shorts हे entertainment + earning दोन्हींसाठी सर्वोत्तम माध्यम आहे.

 

💰 2025 मध्ये Shorts वरून पैसे मिळवण्याचे नवीन अपडेट्स.

YouTube ने 2025 साली Shorts साठी काही मोठे अपडेट्स आणले आहेत जसे की,

1️⃣ Revenue Sharing System: आता Shorts वर जाहिराती (ads) दाखवल्या जातात आणि त्या उत्पन्नात क्रिएटर्सना काही भाग मिळतो.

2️⃣ Affiliate & Brand Deals: Shorts च्या description मध्ये लिंक देऊन तुम्ही affiliate marketing करू शकतात.

3️⃣ Fan Funding (Super Thanks): प्रेक्षक थेट पैसे देऊन तुम्हाला funding द्वारे support करू शकतात.

4️⃣ AI Tools Integration: YouTube Studio मध्ये AI script generator आणि auto-caption फीचर add केले आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा upcoming shorts साठी ideas मिळवू शकतात.

🎥 AI चा वापर करून YouTube Shorts कसे बनवायचे?

AI टूल्सच्या मदतीने आता फक्त काही मिनिटांत Short तयार करणं शक्य झालं आहे. तुम्हाला प्रोफेशनल एडिटिंग, व्हॉइसओव्हर किंवा स्क्रिप्ट रायटिंग शिकायची गरज लागत नाही, कारण ही सगळी कामं AI तुमचा साठी करून देतो. चला, टप्प्याटप्प्याने पाहूया कसे करायचे ते👇

Script तयार करणे: ChatGPT च्या मदतीने आकर्षक स्क्रिप्ट तयार करा. YouTube Shorts चं सर्वात महत्त्वाचं भाग म्हणजे स्क्रिप्ट. जर तुमची स्क्रिप्ट आकर्षक असेल, तर प्रेक्षक पहिल्याच काही सेकंदात अट्रक्ट होतील आणि तुमचे शॉर्ट्स वायरल होण्याचे संभावना वाढतील. AI टूल्स जसे ChatGPT किंवा Gemini तुम्हाला काही सेकंदांत व्हिडिओसाठी पूर्ण स्क्रिप्ट लिहून देऊ शकतात. फक्त योग्य “Prompt” वापरता आले पाहिजे👇

🧠 Prompt उदाहरणे: “Create a motivational 30-second script in Marathi.” “Explain AI in 20 seconds in a fun and simple Marathi style.” “Write a short story on success in 45 seconds in Marathi.”

Voiceover तयार करणे: AI आवाज आता तुमचाच ब्रँड बनेल. एक उत्तम आवाज व्हिडिओचं इम्पॅक्ट डबल करू शकतो. जर तुम्हाला स्वतःचा आवाज रेकॉर्ड करायचा नसेल, किंवा तुम्हाला आवडत नसेल तर AI व्हॉइस टूल्स चा वापर करणे योग्य राहील.

🎙️मार्केट मध्ये असलेली सर्वोत्तम AI Voice Tools:

ElevenLabs: eleven labs मध्ये तुम्हाला खूप सारे आवाजाचे samples मिळतील त्यापैकी तुम्हाला तुमचा स्पोर्ट्स शी मॅच करणारा आवाज घ्यायचा आहे, eleven labs चा मदतीने फ्री मध्ये खूप सारे voiceovers generate करू शकतात. त्याचबरोबर eleven labs sarkhe akhun kahi free ai voice generate sites ahe khancha वापर तुम्ही करू शकतात, जसे की,  Speechelo: YouTube साठी Optimized voice.

Play.ht: Custom Voice तयार करण्याची सुविधा.

AI आवाज वापरून होणारे फायदे:

AI आवाज नेहमी एकसारखा राहतो (Consistency). त्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि  काही सेकंदांत तयार व्हॉईस generate होतो, Ai voice Professional टोनमुळे विश्वास वाढतो.

Video Editing & Visuals: market मधे खूप सारे ai video editing tools आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा शॉर्ट ला आणखी आकर्षक आणि दर्जेदार बनवू शकतात. Editing करणे आता अवघड राहिलेले नाही! AI टूल्स  चा वापर करून तुम्ही आपोआप कट, इफेक्ट्स आणि ट्रान्झिशन तयार करू शकतात.

🎬 Ai Editing Tools:

Pictory AI:  स्क्रिप्ट टाकली की तो स्वतःच व्हिडिओ बनवून देतो, तुम्हाला काहीच करायची गरज पडत नाही.

Runway ML: याचा वापर तुम्ही AI Effects, Green Screen Removal साठी करु शकतात.

CapCut: जर तुम्ही मोबाईल वर काम करत असाल तर Capcut हे तुमचा साठी उत्तम पर्याय असेल, मोबाइलवर जलद एडिटिंग करण्यासाठी तुम्ही Capcut वापरू शकतात.

Canva Video Editor: Templates बनवण्यासाठी आणि Text Animation साठी अप्रतिम पर्याय आहे.

Thumbnail Design: पहिलं Impression हाच सगळ्यात मोठा Hook असतो. थंबनेल म्हणजे YouTube वरचं पहिलं आकर्षण असते.AI Tool Canva AI ने तुम्ही काही मिनिटांत लक्ष वेधून घेणारे थंबनेल तयार करू शकतोस.

🎨 थंबनेल तयार करताना काही लक्षात ठेवण्यासारखे गोष्टी:

Background Bright आणि Contrast असावा. मोठ्या, स्पष्ट मराठी अक्षरात Text चा वापर करावा. चेहऱ्यावर Expression आणि Eye Contact असलेली Image ठेवा. लाल, पिवळा आणि पांढरा हे रंग Click Rate वाढवतात.

📱YouTube Shorts वर Monetization कसे करायचं?

YouTube Shorts फक्त पॉप्युलर होण्यासाठी नसून त्याद्वारे  तुम्ही पैसे कमवू शकतात.जर तुम्ही कॉन्सिस्टंटली शॉर्ट्स बनवून अपलोड केले आणि योग्य रणनीती वापरत असाल, तर YouTube Shorts द्वारे तुम्ही महिन्याला हजारो रुपये कमवू शकता. चला तर पाहूया यूट्यूब शॉर्ट्स द्वारे पैसे कमवायचे विविध साधन 👇

YouTube Partner Program (YPP) नियम. YouTube वरून थेट पैसे कमवण्यासाठी तुम्हाला YouTube Partner Program (YPP) मध्ये सहभागी व्हावं लागेल.

Shorts साठीचे नियम थोडे वेगळे आहेत:

📊 YPP पात्रता (Eligibility): किमान 500 Subscribers हवे असतात.

मागील 90 दिवसांत 3 Million Shorts Views पूर्ण झाले पाहिजे.

सर्व व्हिडिओ Original आणि स्वतः तयार केलेले असावेत.

Reused किंवा Re-upload केलेले व्हिडिओ स्वीकारले जात नाहीत.

Shorts Fund vs Ad Revenue. पूर्वी YouTube ने Shorts creators साठी “YouTube Shorts Fund” नावाचा खास फंड तयार केला होता. पण 2023 पासून YouTube ने Ad Revenue Sharing System सुरु केलं आहे, ज्यामध्ये Shorts वर लागणाऱ्या जाहिरातींच्या उत्पन्नाचा एक हिस्सा creators ला दिला जातो.

Affiliate Marketing आणि Sponsorship. YouTube Shorts वरून फक्त Ads नाही, तर इतरही इन्कम सोर्सेस आहेत, जसे Affiliate Marketing आणि Brand Sponsorships.

💼 Affiliate Marketing कसं काम करतं?

तू Amazon, Flipkart, AppSumo किंवा AI Tools च्या affiliate programs मध्ये सहभागी होऊ शकतोस. उदा. तू “AI Voiceover Tools Review” Short बनवलास, तर Description मध्ये affiliate link दिल्यास लोकांनी ते खरेदी केल्यावर तुला कमिशन मिळेल.

🤝 Brand Sponsorship कशी मिळवायची?

आधी consistent content तयार करा, specific niche (AI, Tech, Finance इ.) निवडा, ब्रँड्सशी ईमेल किंवा LinkedIn द्वारे संपर्क साधा.

AI वापरून Passive Income कशी मिळवायची?

आजच्या काळात “Passive Income” म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न झाले आहे, एकदाच मेहनत करून नंतर सातत्याने पैसे मिळवत राहणं म्हणजे passive income source.AI Tools मुळे हे आता शक्य झालं आहे! तू एकदा योग्य पद्धतीने YouTube Shorts तयार केले, तर त्या व्हिडिओंमधून महिन्योनमहिने कमाई सुरू राहू शकते.

एकदा तयार केलेल्या व्हिडिओंमधून दीर्घकालीन कमाई. AI च्या मदतीने तयार केलेले व्हिडिओ 24×7 views मिळवू शकतात. Shorts चा अल्गोरिदम जुन्या व्हिडिओंनाही पुन्हा “Push” करतो,म्हणून जुने व्हिडिओही नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात.

📈 उदाहरण: तू “AI वापरून पैसे कसे कमवायचे?” असा Short बनवला, आणि तो महिन्याभरात व्हायरल झाला, तर त्यातून मिळणारा Ad Revenue, Affiliate Income किंवा Sponsorship तुला पुढील काही महिन्यांतही मिळत राहील.

Auto-upload Tools आणि Scheduling वापरणे. AI ने तुम्हाला फक्त व्हिडिओ बनवायला नाही, तर तो publish करायलाही मदत केली आहे. Auto-upload आणि Scheduling Tools वापरून तुम्ही संपूर्ण आठवड्याचे Shorts आधीच प्लॅन करू शकता.

⚙️ उपयुक्त Tools: Pictory + YouTube Studio Scheduler तयार व्हिडिओंना आपोआप अपलोड करतो.

Repurpose.io: Shorts ला Instagram Reels, Facebook आणि TikTok वर रीपोस्ट करण्यासाठी वापरतात.

Buffer / Later: Social media auto-scheduling साठी वापरतात.

AI Analytics Tools ने Performance Track करणे. Passive Income मिळवायचे असेल, तर फक्त व्हिडिओ बनवून थांबायचं नाही तर त्यांचा Performance track करणं खूप महत्त्वाचं असते.

📊 सर्वात उपयुक्त AI Analytics Tools:

vidIQ / TubeBuddy: Keywords, CTR, आणि Audience Retention समजण्यासाठी खूप महत्वाचे टूल्स आहेत.

YouTube Studio Analytics:  Watch time आणि Revenue ट्रॅक करण्यासाठी सर्वात उत्तम सोर्स आहे.

Notion AI / ChatGPT: Data चा अर्थ समजावून पुढच्या व्हिडिओसाठी सुधारणा करण्यासाठी कामाला येते.

 

📊 AI वापरून YouTube चं SEO कसं करायचं?

YouTube वर यशस्वी होण्यासाठी केवळ चांगला व्हिडिओ बनवणं पुरेसं नसतं तर योग्य SEO (Search Engine Optimization) सुद्धा तितकेच महत्वाचे असते. AI टूल्सच्या मदतीने तुम्ही तुमचा व्हिडिओला अधिक views, watch time आणि CTR मिळवू शकता. चला पाहू या हे कसं करायचं👇

🧠 ChatGPT वापरून Title, Tags आणि Description तयार करा, तुमचा व्हिडिओचा विषय ChatGPT मध्ये टाका आणि असा prompt वापरा,  “Write SEO-friendly YouTube title, tags, and description for a Marathi motivational short video.”

त्या नंतर 🔍 TubeBuddy आणि VidIQ वापरून Keyword Research करा. हे दोन्ही Chrome extensions आहेत जे YouTube SEO साठी अत्यंत उपयुक्त आहेत.

TubeBuddy तुम्हाला योग्य tags, trending topics आणि competitor analysis दाखवतो. आणि VidIQ तुम्हाला keyword score, volume आणि ranking potential दाखवतो.n👉 या टूल्सच्या मदतीने तुम्ही व्हिडिओ अपलोड करण्याआधी योग्य keyword निवडू शकता.

📈 CTR आणि Watch Time वाढवण्यासाठी डेटा विश्लेषण करणे. AI आधारित analytics tools (जसे TubeBuddy AI Studio) तुमचा व्हिडिओंचं CTR (Click-Through Rate) आणि Watch Time मोजतात. त्यावरून तुम्हाला समजतं की प्रेक्षक कुठे सोडून जातात आणि कोणते थंबनेल जास्त क्लिक होतात इत्यादी माहिती तुम्हाला पुढील शॉर्ट्स बनवताना खूप कामाला येते. या insights वर काम करून तुम्ही पुढील व्हिडिओ अधिक प्रभावी बनवू शकता.

🧠 AI वापरून Shorts चॅनेलचं Automation कसं करायचं?

YouTube वर रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकणं हे वेळखाऊ काम असतं. पण आता AI tools च्या मदतीने तुम्ही तुमचे Shorts चॅनेल पूर्णपणे ऑटोमेट करू शकता.

म्हणजे स्क्रिप्ट, व्हॉइसओव्हर, एडिटिंग, थंबनेल आणि अपलोड करणे, हे सर्व AI स्वतःच हाताळू शकतो!

⚙️ Step 1: Script Automation: ChatGPT / Gemini चा वापर करा. ChatGPT ला असा prompt द्या:

“Generate 30 motivational YouTube Shorts ideas in Marathi.” AI तुम्हाला दररोज नवे script ideas देईल. त्यानंतर तुम्ही “Auto Script Generator” टूल (उदा. Notion AI किंवा Writesonic) वापरून त्या स्क्रिप्ट्स auto format मध्ये तयार करू शकता.

🎙️ Step 2: Voiceover Automation. तुम्ही व्हॉइसओव्हर स्वतः न रेकॉर्ड करता, ElevenLabs, Play.ht किंवा Lalal.ai चा वापर करून मराठी आवाज तयार करू शकता. AI आवाज नैसर्गिक आणि consistent असतो, म्हणून Shorts साठी परफेक्ट आहे.

🎬 Step 3: Video Editing Automation. Pictory, Runway ML, CapCut Auto Edit हे टूल्स script वरून आपोआप व्हिडिओ तयार करतात. फक्त टेक्स्ट अपलोड करा आणि योग्य template निवडा.AI त्यानुसार visuals आणि music जोडून देईल.

🎥 जसे की: ChatGPT ने स्क्रिप्ट लिहा → ElevenLabs ने आवाज तयार करा → Pictory ने त्यावर व्हिडिओ तयार करा आणि पूर्ण प्रोसेस = 10 मिनिटांपेक्षा कमी वेळ होऊन जाईल!

🖼️ Step 4: Thumbnail आणि Upload Automation. Canva Magic Studio किंवा Thumbnail AI वापरून AI थंबनेल तयार करा. Upload साठी “YouTube Auto Uploader” (Pabbly Connect / Zapier) वापरा, जो तुमच्या Google Drive मधून videos auto-upload करतो.

📈 Step 5: Analytics & Optimization Automation. तुमचं काम इथेच संपत नाही! AI tools (जसे vidIQ AI Coach) तुम्हाला सांगतात की कोणता व्हिडिओ जास्त चालतो, कोणत्या वेळेला upload करावं, आणि कोणता topic trending आहे.

हे insights वापरून तुम्ही तुमचे channel दररोज improve करू शकता.

🎯 थोडक्यात सांगायचं झालं तर: AI वापरून YouTube Shorts चॅनेल ऑटोमेट केल्यास,

✅ वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतो.

✅ सातत्य टिकवता येतं.

✅ आणि Passive Income मिळवता येते.

 

🎯 नवशिक्यांसाठी Step-by-Step रोडमॅप (YouTube Shorts Beginner Plan 2025)

जर तुम्ही नुकताच YouTube सुरू करतोयस आणि AI चा वापर करून Shorts Channel बनवायचा विचार करत असाल, तर हा रोडमॅप खास तुमचा साठी बनवला आहे. फक्त 7 स्टेप्स फॉलो करा, आणि तुमचे चॅनेल तयार होईल तेही कोडिंग, एडिटिंग किंवा महागडे gadgets न वापरता! 💡

🪜 Step 1: Niche ठरवा (Decide Your Niche). सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवणार आहात?

🎙️ Motivation & Quotes,💡 Tech & AI Tools, 📚 Knowledge & Facts, 😂 Funny / Entertainment

👉 ChatGPT ला विचारा:  “Suggest 10 profitable YouTube Shorts niches in Marathi.”  AI तुम्हाला सर्वात trending आणि कमाई होणारे विषय सांगेल.

🪜 Step 2: Channel Setup करा. YouTube वर नवीन Channel तयार करा. प्रोफाइल फोटो, बॅनर आणि “About” सेक्शन तयार करा (Canva AI वापरा).Description मध्ये keywords वापरा उदा. “AI Shorts in Marathi”, “Motivational Marathi Shorts”.Social Links आणि ईमेल टाका (brand collabs साठी)

🪜 Step 3: Script तयार करा (Using ChatGPT). तुमच्या विषयावर मराठी स्क्रिप्ट तयार करा.

Prompt उदाहरण:  “Write a 30-second motivational script in Marathi for YouTube Shorts.”

AI तुम्हाला आकर्षक आणि emotion-filled स्क्रिप्ट देईल. तुम्ही त्याला personal touch देऊन अजून engaging बनवू शकता.

🪜 Step 4: Voiceover तयार करा (AI Voice Tools वापरून). ElevenLabs, Play.ht, Speechelo किंवा HeyGen वापरून AI Voice तयार करा. मराठी आवाज निवडा आणि स्क्रिप्ट कॉपी-पेस्ट करा  काही सेकंदांत voice तयार होईल! 🎤

🪜 Step 5: व्हिडिओ तयार करा (Video Editing Made Easy). Pictory.ai / Runway ML / CapCut वापरून script आणि voice एकत्र करा. AI templates वापरा:  background, transitions, subtitles सगळं auto होईल. आवश्यक असल्यास “AI B-roll” visuals जोडा.

🪜 Step 6: Thumbnail आणि Title तयार करा. Canva AI वापरून आकर्षक Thumbnail बनवा. Title साठी ChatGPT वापरा: “Write a catchy YouTube Shorts title in Marathi.”

🪜 Step 7: Upload आणि SEO Optimization.

व्हिडिओ YouTube वर Upload करा. Tags आणि Description साठी TubeBuddy / VidIQ AI Coach वापरा. AI सांगेल कोणते keywords जास्त search होतात त्या कीवर्ड चा वापर करा.

🚀 भविष्यातील संधी (Future of AI + YouTube Shorts)

आजपासून काही वर्षांपूर्वी व्हिडिओ बनवण्यासाठी टीम, कॅमेरा, आवाज आणि एडिटर लागायचे. पण आता AI Automation मुळे एकटा व्यक्तीही संपूर्ण YouTube ब्रँड बनवू शकतो तेही फक्त मोबाईल किंवा लॅपटॉपवरून! चला पाहूया पुढील काही वर्षांत कोणत्या नव्या संधी तयार होणार आहेत 👇

🤖 1️⃣ AI Automation Channels:  नवीन युगाचा ट्रेंड. आज अनेक यशस्वी YouTube Channels पूर्णपणे AI वर चालतात. त्यात script, voice, video visuals आणि editing हे सगळं automated झालं आहे. उदाहरणार्थ, “Motivational Quotes”, “Tech Facts”, “AI News” किंवा “Mythological Stories” सारख्या निचेसमध्ये हजारो AI automation channels आहेत.

💡 ऑटोमेशन चा वापर करून होणारे फायदे:

24/7 Content तयार करण्याची क्षमता.

कमी खर्च आणि वेळेत जास्त व्हिडिओ.

एकाच व्यक्तीकडून संपूर्ण टीमचे काम.

🎯 भविष्यातील संधी: अशा channels साठी brands, agencies आणि कंपन्या आता AI content managers आणि automation experts शोधत आहेत. जर तुम्ही पण आजपासून  जे शिकलात, तर उद्या तुम्ही स्वतःच clients साठी AI आधारित YouTube channels चालवू शकता.

🗣️ 2️⃣ Voice Clone Channels: प्रेरणा देणारे “Virtual आवाज” AI Voice Cloning ही 2025 मधील सर्वात वेगाने वाढणारी ट्रेंड आहे. आज ElevenLabs, Play.ht, आणि Resemble AI सारख्या टूल्सनी आवाज अगदी माणसासारखा बनवता येतो.

📍 उदाहरण: तू स्वतःचा voice clone तयार करून, Motivational Shorts, Storytelling Videos किंवा Educational Explainers यांसारखे कंटेंट तयार करू शकतोस. हे “AI Voice Channels” रातोरात व्हायरल होतायत कारण लोकांना natural, emotional आणि consistent आवाज आवडतो.

💡 यामुळे होणारे फायदे:  स्वतः कॅमेरासमोर यायची गरज  राहत नाही, एकाच आवाजातून शेकडो व्हिडिओ तयार होतात, Short-form content मध्ये ब्रँड ओळख मजबूत होते.

👩‍💻 3️⃣ AI Influencers आणि Virtual Creators. आता Influencer world मध्ये एक नवीन प्रकार आला आहे ज्याला “Virtual Influencers” असे म्हणतात. हे असे AI-generated चेहरे आहेत जे कधीच थकत नाहीत, झोपत नाहीत आणि दररोज नवा कंटेंट तयार करण्यास मदत करतात.

🏁 निष्कर्ष (Conclusion).

AI मुळे आता व्हिडिओ बनवणं म्हणजे काही तासांचं नाही तर काही मिनिटांचं काम झालं आहे. फक्त योग्य Tools, थोडी सर्जनशीलता आणि सातत्य ठेवले, तर तुम्ही घरबसल्या स्वतःचा “AI-Generated YouTube Shorts” ब्रँड तयार करू शकता यात शंका नाही.

आजच्या काळात Content म्हणजे Power आहे आणि AI म्हणजे त्या Power चे इंजिन आहे जे त्याला गती देण्याचे काम करते. जे लोक आज या तंत्रज्ञानाला समजून वापरत आहेत, तेच उद्या YouTube वर आणि डिजिटल जगात पुढे असतील. तर  आजच सुरुवात करा. एक शॉर्ट्स साठीची Script ChatGPT वरून तयार करून पहा, आवाज साठी  ElevenLabs ची मदत घ्या आणि voice genrate करा, आणि Canva ने थंबनेल तयार करून तुमचा पहिला व्हिडिओ YouTube Shorts वर अपलोड करा.

Leave a Comment