AI Agent म्हणजे काय? सोप्या भाषेत समजून घ्या AI Agents बद्दल सर्व काही!
आजच्या काळात तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे आणि त्यामध्ये एआय एजेंट ही संकल्पना खूप चर्चेत आली आहे. पूर्वी जे काम एक सामान्य सॉफ्टवेअर डेव्हलपर करत होता, तेच काम आता एआय एजंट अधिक वेगाने आणि कमी खर्चात करू लागले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या मोठ्या टीमऐवजी कमी पण एआय तंत्रज्ञान शिकणाऱ्या लोकांना कामावर ठेवत आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हे AI Agents नेमके काय आहे? आणि ते खरंच भविष्यात आपल्या नोकऱ्यांवर किती परिणाम करू शकतात ?
सध्या Nvidia चे संस्थापक असो किंवा Meta चे CEO मार्क झुकरबर्ग अनेक मोठ्या कंपनीचे ceo असे सांगत आहेत की AI Agents हे भविष्यातील मोठे तंत्रज्ञान असणार आहे. पण अजूनही अनेकांना AI Agents म्हणजे नेमकं काय, ते कसे काम करतात आणि त्यांचा उपयोग कशासाठी होतो हे अजूनही माहिती नाही. म्हणूनच या पोस्टमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत AI Agents बद्दल समजून घेणार आहोत. तुम्हाला कोडिंग येत असो किंवा नसो, तांत्रिक ज्ञान असो किंवा नसो ही माहिती तुम्हाला सहज समजेल अशी दिली आहे.
या पोस्टमध्ये आपण AI Agents बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सर्वात आधी AI Agent म्हणजे काय ? हे समजून घेऊ. त्यानंतर ChatGPT सारख्या AI टूल्स आणि AI Agents यांच्यामध्ये काय फरक आहे हे पाहणार आहोत. पुढे आजच्या बाजारात उपलब्ध असलेल्या AI Agents चे काही चांगले उदाहरणे देखील पाहणार आहोत, ज्यामुळे त्यांची क्षमता तुम्हाला समजेल. आणि शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःचा AI Agent कसा तयार करू शकता ? हे देखील जाणून घेणार आहोत जसे कोडिंग वापरून आणि कोडिंग न करता अशा दोन्ही पद्धतींनी दिले आहे. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा, कारण यातून तुम्हाला AI Agents बद्दल खूप गरजेची माहिती मिळणार आहे.
AI Agent म्हणजे काय?
एआय एजंट समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण पाहूया. आपण माणसं रोजच्या आयुष्यात अनेक लहान-मोठे काम करत असतो. उदाहरणार्थ कॅब बुक करणे, ऑनलाईन शॉपिंग करणे, किराणा मागवणे, ईमेलला उत्तर देणे किंवा रोजच्या कामांची यादी पूर्ण करणे. अशा प्रकारची अनेक कामे आपण वारंवार करत असतो आणि त्यासाठी वेळही खर्च होतो. इथेच एआय एजंट उपयोगी ठरतो.
एआय एजंट म्हणजे असा डिजिटल असिस्टंट जो तुमच्या मदतीसाठी काम करतो. तुम्ही त्याला एकदा काम सांगितले की तो ते काम स्वतः पूर्ण करू शकतो. म्हणजेच प्रत्येक वेळी माणसाने हस्तक्षेप करण्याची गरज नसते, कारण AI Agent स्वतः निर्णय घेऊन काम पूर्ण करण्याची क्षमता ठेवतो.
सोप्या शब्दांत सांगायचं तर एआय एजंट हा एक प्रकारचा सॉफ्टवेअर किंवा टूल असतो, जो तुमच्या रोजच्या कामांमध्ये मदत करण्यासाठी तयार केलेला असतो. तो दिलेल्या सूचना समजून घेतो, आवश्यक माहिती शोधतो आणि तुमच्यासाठी काम पूर्ण करतो. त्यामुळे भविष्यात AI Agents मुळे अनेक कामे अधिक वेगाने आणि सोप्या पद्धतीने करता येतील.
ChatGPT vs AI Agent: नेमका फरक काय? / Which is better?
एआयबद्दल बोलताना अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की ChatGPT आणि एआय एजंट यांच्यात नेमका फरक काय आहे? कारण दोन्हीही AI तंत्रज्ञानावर आधारित आहेत. पण त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा फरक आहे. खाली सोप्या मुद्द्यांमध्ये हा फरक समजून घेऊया.
1. ChatGPT म्हणजे काय?
- ChatGPT किंवा WhatsApp मधील Meta AI हे Generative AI प्रकारात येतात.
- यात तुम्ही प्रश्न विचारल्यावर ते तुम्हाला टेक्स्ट स्वरूपात उत्तर देत असतात.
- उदाहरणार्थ: प्रश्नाचे उत्तर देणे, ईमेल लिहून देणे, माहितीचा सारांश (summary) तयार करणे इत्यादी.
2. ChatGPT कसे काम करते?
- ChatGPT फक्त तुम्ही दिलेल्या प्रश्नांवर किंवा सूचनांवर काम करते.
- म्हणजे तुम्ही अधिक काही विचारले नाही तर ते स्वतःहून काही काम करत नाही.
- त्यामुळे ते जास्त करून Question-Answer System सारखे काम करत राहते.
3. ChatGPT काय करू शकते?
- प्रश्नांची उत्तरे देणे.
- लेख किंवा ईमेल तयार करून देणे.
- माहितीचा सारांश देणे.
- काही विषयांवर मार्गदर्शन करणे.
सोप्या शब्दांत सांगायचे तर ChatGPT हे मुख्यतः माहिती देणारे किंवा कंटेंट तयार करणारे AI टूल आहे, जे तुमच्या प्रश्नांनुसार उत्तर तयार करते.
एआय एजंट कसे काम करते?
AI Agent कसा काम करतो हे समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण पाहूया. AI Agent मध्ये Generative AI ची क्षमता असतेच, पण त्यासोबतच त्याला विविध टूल्सचा वापर करण्याची क्षमता असते. म्हणजेच तो ब्राउझर उघडू शकतो, अॅप वापरू शकतो, माहिती शोधू शकतो आणि गरज पडल्यास एखादं काम पूर्णही करू शकतो.
खालील स्टेप्समधून AI Agent कसा काम करतो ते समजून घेऊया.
1. वापरकर्त्याची सूचना समजून घेणे.
- सर्वप्रथम AI Agent तुम्ही दिलेली सूचना समजून घेतो. उदाहरणार्थ, तुम्ही AI ला सांगितलं, “माझ्यासाठी एक पिझ्झा ऑर्डर कर.”
- एआय एजंट आधी तुमचं म्हणणं समजून घेतो की तुम्हाला काय करायचं आहे.
2. आवश्यक माहिती प्रक्रिया करणे.
- यानंतर एआय एजंट त्या कामासाठी लागणारी माहिती तपासतो.
- तो इंटरनेटवर किंवा ब्राउझरमध्ये जाऊन जवळच्या पिझ्झा दुकानांची माहिती शोधू शकतो.
3. पर्याय शोधणे.
- यानंतर AI Agent विविध पर्याय दाखवतो.
उदाहरणार्थ:
Pizza Hut
Domino’s
Joeys Pizza - यापैकी कोणता पर्याय योग्य आहे हे तो पुढील माहितीवर आधारित ठरवू शकतो.
4. जुनी माहिती (History) तपासणे.
- AI Agent तुमची आधीची पसंती किंवा इतिहासही पाहू शकतो.
- उदाहरणार्थ:
तुम्ही आधी कोणत्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर केली आहे - तुम्हाला कोणता पिझ्झा जास्त आवडतो,या माहितीच्या आधारे तो योग्य पर्याय निवडतो.
5. अतिरिक्त सूचना देणे.
- AI Agent परिस्थितीनुसार काही सूचना देखील देऊ शकतो.
- उदाहरणार्थ:
पिझ्झासोबत कोल्ड ड्रिंक घ्यायची का?
हवामान गरम असल्यामुळे पेय जोडण्याचा सल्ला देऊ शकतो.
6. ऑर्डर पूर्ण करणे.
शेवटी एआय एजंट तुमचा पत्ता, पेमेंट पद्धत आणि इतर माहिती वापरून ऑर्डर पूर्ण करतो.
म्हणजेच संपूर्ण प्रक्रिया तो स्वतः पूर्ण करू शकतो.
7. पूर्ण काम स्वतः करणे.
ChatGPT साधारणपणे तुम्हाला फक्त काय करायचं ते सांगू शकतो, पण एआय एजंट मात्र त्या कामासाठी लागणारी सर्व पावलं स्वतः उचलतो.
उदाहरणार्थ:
- ब्राउझर उघडणे.
- वेबसाइट शोधणे.
- योग्य वस्तू निवडणे.
- ऑर्डर प्लेस करणे.
यामुळे AI Agent End-to-End काम पूर्ण करू शकतो.
AI Agents चे काही Real-World Examples.
आता AI Agents कसे वापरले जातात हे समजून घेण्यासाठी काही खरे उदाहरण (Use Cases) पाहूया. सध्या बाजारात असे अनेक AI Agents उपलब्ध आहेत जे विविध कामे आपोआप पूर्ण करू शकतात.
1. HyperWrite AI
- HyperWrite हा असा AI Agent आहे जो वेब ब्राउझर माणसासारखा वापरू शकतो.
- उदाहरणार्थ, तुम्ही त्याला सांगितले की “लव्हवर एक ट्वीट पोस्ट कर” तर तो इंटरनेटवर योग्य मजकूर शोधू शकतो.
- अगदी तो तुमच्या ट्विटर अकाउंटमध्ये लॉगिन करू शकतो.आणि थेट ट्वीट पोस्ट देखील करू शकतो.
- तो फक्त माहिती देत नाही तर प्रत्यक्ष action घेऊन काम पूर्ण करतो.
- याशिवाय HyperWrite ईमेल पाठवणे, ऑनलाइन ऑर्डर करणे यासारखी कामेही करू शकतो.
2. Lovable, Replit आणि Meta GPT
- हे AI Agents वेबसाइट, अॅप किंवा सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी वापरले जातात.
- उदाहरणार्थ Lovable मध्ये तुम्ही फक्त prompt लिहायचा “मला अशी वेबसाइट तयार करायची आहे.” आणि तुमची काय गरज आहे सांगा.
- त्यानंतर AI Agent काही सेकंदांत:
Frontend
Backend
Database तयार करून देतो. - Replit आणि Meta GPT सुद्धा याच प्रकारे काम करतात.
- हे AI Agents लहान software development टीमप्रमाणे काम करतात.
3. Otter AI
- Otter AI हा AI Agent मुख्यतः मीटिंग व्यवस्थापनासाठी वापरला जातो.
- पूर्वी तो फक्त मीटिंग ऐकून Transcript तयार करायचा आणि मीटिंगची summary देत होता.पण आता तो अधिक चांगल्या पद्धतीने काम करत आहे.
- आता हा AI Agent Zoom किंवा Google Meet मध्ये join होऊ शकतो.
मीटिंगचे रेकॉर्ड ठेवतोआणि आवश्यक प्रश्नांची उत्तरेही देऊ शकतो. - म्हणजेच आपण जेव्हा विचारतो की “मागील मीटिंगमध्ये काय चर्चा झाली होती?” तर तो लगेच माहिती देऊ शकतो.
4. D-ID AI Agent
- D-ID हा एक Human-like interaction AI Agent आहे.
- तो तुमच्याशी व्हिडिओ कॉलसारख्या स्वरूपात बोलू शकतो, जणू तुम्ही एखाद्या जिवंत माणसाशी संवाद करत आहे.
- याचे काही महत्त्वाचे उपयोग:
Customer Support
Online Teaching
Language Learning - उदाहरणार्थ, जर तुम्हाला इंग्रजी बोलण्याचा सराव करायचा असेल तर हा AI Agent तुमच्याशी संवाद साधून तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्रजी शिकवू शकतो.
भविष्यात AI मुळे कोणत्या प्रकारची Hiring होणार?
तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्यामुळे कंपन्यांची हायरिंग पद्धत देखील बदलत आहे. भविष्यात अनेक कंपन्या AI तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्य असलेल्या लोकांना जास्त प्राधान्य देणार आहेत. याबाबत एक रोचक माहिती शेअर केली जाते की पुढील काळात कंपन्या मुख्यतः तीन प्रकारच्या लोकांना कामावर ठेवू शकतात.
1. AI Builders
- हे लोक टेक्निकल ज्ञान असलेले तज्ञ असतात.
त्यांना AI मॉडेल्स आणि AI Agents तयार करण्याचे कौशल्य असते. - कंपन्यांसाठी नवीन AI टूल्स किंवा एजंट्स तयार करणे हे त्यांचे मुख्य काम असते.
- त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना उच्च पगार आणि मोठ्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
2. AI Operators
- AI Operators हे प्रामुख्याने ज्युनियर लेव्हलवर काम करणारे लोक असतात.
- त्यांना फार जास्त कोडिंगची गरज नसते, पण थोडं कोडिंग आणि थोडं नो-कोड टूल्स वापरता येणं आवश्यक असतं.
- त्यांचं काम म्हणजे:
तयार केलेल्या एआय एजंट चालवणे.
त्यांना योग्य सूचना (prompts) देणे.
कामांचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे.
3. Senior Leaders
- हे लोक मुख्यतः बिझनेस स्ट्रॅटेजी आणि संधी शोधण्याचं काम करतात.
- त्यांना कुठे AI वापरून व्यवसाय वाढवता येईल हे समजते.
- त्यानुसार ते एआय एजंट वापरून संपूर्ण कामाची योजना तयार करतात.
- त्यामुळे आधी जिथे मोठ्या टीमची गरज होती, तिथे आता कमी लोकांमध्येच काम पूर्ण होऊ शकते.
AI मुळे नोकऱ्यांवर परिणाम होईल का?
सध्या लगेच नोकऱ्या संपतील असं नाही, पण भविष्यात AI तंत्रज्ञानाचा प्रभाव नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे जर आपण AI शिकण्याकडे दुर्लक्ष केले, तर काही प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच योग्य वेळेत AI संबंधित कौशल्य शिकणे महत्त्वाचे ठरते.
📍 एआय एजंट कसे शिकायचे?
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की AI Agents शिकायचे कसे?साधारणपणे AI Agents शिकण्यासाठी दोन मुख्य पद्धती आहेत.
1. Coding वापरून AI Agents शिकणे.
जर तुम्हाला प्रोग्रामिंगची माहिती असेल किंवा तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंडमधून असाल, तर ही पद्धत तुमच्यासाठी योग्य आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी शिकाव्या लागतात:
१) LangChain
- LangChain हे एआय एजंट तयार करण्यासाठी वापरले जाणारे एक महत्त्वाचे framework आहे.
- याच्या मदतीने AI मॉडेल्स आणि विविध टूल्स एकत्र जोडता येतात.
२) Browser Integration Tools
उदाहरण: Playwright, Puppeteer
या टूल्सच्या मदतीने AI Agents वेब ब्राउझरशी जोडले जातात आणि ब्राउझरमध्ये action घेऊ शकतात.
३) JavaScript आणि Node.js
AI Agents तयार करताना थोडेफार JavaScript आणि Node.js चे ज्ञान असणे उपयुक्त ठरते.
४) Tools Integration Skill
- वेगवेगळे टूल्स आणि सिस्टम एकत्र करून पूर्ण AI Agent तयार करण्याची क्षमता असणे महत्त्वाचे आहे.
- जर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल क्षेत्रात असाल, तर ही कौशल्ये शिकणे भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
2. No-Code पद्धतीने AI Agents शिकणे.
- ज्यांना कोडिंग येत नाही किंवा नॉन-टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, त्यांच्यासाठीही AI Agents तयार करण्याचे खूप पर्याय उपलब्ध आहेत.
- यासाठी काही लोकप्रिय टूल्स वापरले जाऊ लागले आहेत.
१) CrewAI
- या टूलच्या मदतीने तुम्ही AI Agents तयार करू शकता, तेही कोडिंग न करता.
- हे शिकण्यासाठी त्यांचे छोटेखानी कोर्सेसही उपलब्ध आहेत.
२) Make (Automation Tool)
विविध अॅप्स आणि टूल्स एकत्र जोडून ऑटोमेशन तयार करता येते.
३) n8n
- n8n हे एक शक्तिशाली automation टूल आहे.
- यात तुम्ही वेगवेगळे nodes तयार करून पूर्ण workflow तयार करू शकता.
- उदाहरणार्थ, n8n मध्ये तुम्ही असा workflow तयार करू शकता.
उदाहरणार्थ, n8n मध्ये तुम्ही असा workflow तयार करू शकता:
- एखाद्या विषयावर Research करणे.
- त्यावर माहिती पूर्ण Text Generate करणे.
- त्या टेक्स्टचे Audio तयार करणे.
- त्या ऑडियोवर आधारित AI Video तयार करणे.
- शेवटी तो व्हिडिओ YouTube वर Upload करणे.
यामध्ये शेवटी Human Review Step देखील ठेवता येतो, म्हणजे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर माणूस ते तपासून पुढे पाठवू शकतो.
Final Words :-
एआय एजंट बद्दलची ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे. या पोस्टमधून आपण AI Agent म्हणजे काय, ChatGPT आणि AI Agent मधील फरक, त्याचे उपयोग आणि ते कसे शिकायचे या महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेतल्या.
जर ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही AI Agents बद्दल माहिती मिळेल. तसेच पुढे तुम्हाला AI किंवा टेक्नॉलॉजीशी संबंधित कोणत्या विषयावर पोस्ट हवी आहे, ते कमेंट करून नक्की कळवा.